देशसेवेचे व्रत पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान-भय्याजी काणे हे संघ प्रचारक देशसेवेचे व्रत घेवून भारतभर फिरले. हजारो घरांमध्ये शिक्षणाची, भारतीयत्वाची, देशप्रेमाची ज्योत पेटवली- विवेक मराठी 04-Oct-2017

source link

 शंकर दिनकर उर्फ भय्याजी काणे हे संघ प्रचारक देशसेवेचे व्रत घेवून भारतभर फिरले.  हजारो घरांमध्ये शिक्षणाची, भारतीयत्वाची, देशप्रेमाची ज्योत पेटवली. ईशान्य भारतातील शेकडो मुलांचे ते पालक पिता होते. सध्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या तिन्ही शाळा विनाअनुदानित आहेत. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा  वार्षिक खर्च वीस हजार रुपये आहे. अनिवासी विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च दहा हजार रुपये आहे. प्रतिष्ठानच्या विकासात भर घालण्यासाठी लोकांनी आर्थिक मदत करून हातभार लावणे आवश्यक आहे.
 पूर्वांचल – कला, संस्कृती वैभवाने संपन्न, वनसंपत्तीचे व खनिजसंपत्तीचे वरदान मिळालेला असा पूर्वांचल भारताचा अविभाज्य भाग आहे. पूर्वांचलात  अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि सिक्कीम या आठ राज्यांचा समावेश होतो. 150हून अधिक जनजाती, त्यांच्या जवळजवळ तितक्याच भाषा, विशिष्ट चेहरेपट्टी, दळणवळणाची अपुरी साधने, पायाभूत सुविधांचा अभाव या आणि काही राजकीय कारणांमुळे हा भूभाग बाकी भारतापासून काहीसा अलिप्त राहिला. बांगला देश, भूतान, म्यानमार व चीनचा कब्जा असलेला तिबेट या चार आंतरराष्ट्रीय सीमा या भागाला जोडून आहेत. त्यामुळे दक्षिण-पूर्व आशियावर नजर ठेवण्याकरिता, तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता हे सर्वोत्तम असे मोक्याचे ठिकाण आहे, हे इंग्रजांनी कधीच ओळखले होते. याच कारणासाठी चीनही हा भूभाग आपल्या घशात घालण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
जीवविविधतेने समृध्द असा हा प्रदेश भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतरही या ना त्या प्रकारे आपल्या ताब्यात राहावा, अशा व्यवस्था ब्रिटिशांनी लावल्या. प्रार्थनास्थळे व शिक्षण संस्था यांद्वारे धर्मांतराच्या माध्यमातून येथील समाजाची स्वत:ची ओळख, संस्कृती नष्ट करून, त्यांना जाणीवपूर्वक भारतापासून वेगळे ठेवून उठाव करवावयाचे, वातावरण धुमसत ठेवायचे आणि त्यांना भारतापासून तोडायचे; काही सुविधा दिल्यासारखे करून, त्यांचा स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग करून घ्यायचा अशी ही योजना होती. आहेही. उल्फा, NSCN-IM असे अनेक गट अशा फुटीरतावादी शिकवणीमुळे निर्माण होऊ  लागले. चीनसारखी राष्ट्रे त्यांना कधी छुपेपणाने तर कधी उघडपणे मदत करू लागली. पूर्वांचलात तस्करी आणि तिरस्काराची बीजे फोफावू लागली. भाषेची अडचण, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, अपुरी शिक्षण साधने, शासनाचे दुर्लक्ष, भ्रष्टाचार, बेरोजगारी तसेच सामान्य भारतीयांचे या भागाविषयीचे अज्ञान अशा कारणांमुळे हा समाज मुख्य भारतीय प्रवाहात येऊ शकला नाही.  
स्वातंत्र्योत्तर काळात काही समाजसेवी, राष्ट्रवादी संघटनांना या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने होऊ  लागली. ज्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर प्रश्न, फुटीरतावाद, काश्मिरी पंडितांची हकालपट्टी असे अनेक प्रश्न आज काश्मीरला, संपूर्ण भारताला सतावत आहेत, तसेच या राष्ट्रीय विचारांच्या संस्थांच्या कार्याअभावी ईशान्य भारतातील मूलनिवासींनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. अर्थात भारतीय लष्कराचाही या कामात मोठा वाटा आहेच. सीमावर्ती प्रदेशातील जनतेमध्ये विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक आदान-प्रदानानेच शक्य आहे. म्हणून मग सेवाभावी संस्थांद्वारे त्या समाजाशी जोडून घ्यायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे व शिक्षित करून त्यांना त्यांच्या हक्कांची, त्यांच्या ‘भारतीयत्वाची’ जाणीव करून द्यायची यासाठी काम सुरू झाले. शेकडो देशभक्तांनी या कामात आपल्या आयुष्याची, वेळी आपल्या प्राणांचीही आहुती दिलेली आहे.
शंकर दिनकर उर्फ भय्याजी काणे या अशाच एका रा. स्व. संघाचे संस्कार लाभलेल्या, पण मळलेली वाट न चोखाळता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वेगळा मार्ग स्वीकारून, अनेक संकटांचा सामना करत ध्येयाप्रत पोहोचणाऱ्या अलौकिक माणसाची ही कहाणी आहे. देशसेवेचे व्रत घेतलेला हा शिक्षक भारतभर फिरला. शक्य होईल तिथे राष्ट्रवादी कामाचा विस्तार केला. संस्कारक्षम मनांना योग्य आकार दिला. हजारो घरांमध्ये शिक्षणाची, भारतीयत्वाची, देशप्रेमाची ज्योत पेटवली. ईशान्य भारतातील शेकडो मुलांचे ते पालक पिता होते.
ज्या काळात इंडिया, इंडियन असे शब्दोच्चारही मणिपूरमध्ये संकटाला आमंत्रण ठरू शकत होते, अशा काळात तेथील ‘उखरूल’ नावाच्या अतिदुर्गम जिल्ह्यात त्यांनी आपले काम सुरू केले. म्यानमारपासून केवळ 6 कि.मी. असलेल्या न्यू तुसॉम या सीमावर्ती जंगलांनी वेढलेल्या, मागास भागात त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. त्यांचे परमशिष्य जयवंतराव कोंडविलकर एक थरारक अनुभव सांगतात. 1972 साली, 12 वर्षांच्या छोटया जयवंतला बरोबर घेऊन भय्याजी उखरूलकडून चिंगजोरायकडे जायला निघाले होते. वाटेत काही स्थानिकांनी त्यांना घेरले. त्यांना वाटले, मुले पळवणाऱ्या टोळीतील हा कोणी भामटा आहे. म्हणून या दोघांना बांधून, ठार मारायची तयारी त्यांनी सुरू केली. भय्याजींनी त्यांना मणिपुरी भाषेतून परोपरीने समजावले की मी शिक्षक आहे आणि हा माझा विद्यार्थी आहे. पण ते काहीच ऐकून घेईनात. अशा परिस्थितीतही भय्याजी अतिशय शांत होते. ते त्यांना म्हणाले, ”आम्ही सकाळपासून खूप भुकेलेले आहोत. आम्हाला मारण्यापूर्वी काहीतरी खायला द्या.” हे त्या मंडळींना पटले असावे. ‘सुखदु:ख समेकृत्वा’ या उक्तीप्रमाणे तशाच बांधलेल्या अवस्थेत भय्याजी आणि छोटा जयवंत जेवू लागले. जेवण होईपर्यंत भय्याजींच्या सुदैवाने त्यांना ओळखणारे एक मणिपुरी शिक्षक तिथे आले व भय्याजींची माहिती त्या लोकांना दिली. एक प्रतिष्ठित व्यक्ती यांना ओळखते म्हटल्यावर या जीवघेण्या प्रसंगातून त्यांची सुटका झाली.
भारत आणि भारतीयांविषयी असणारी द्वेषाची भावना कमी व्हावी, ही कोंडी फुटावी यासाठी भय्याजी सतत प्रयत्नशील होते. ते तेथील स्थानिकांशी, मिलिटरीच्या लोकांशी, IAS अधिकाऱ्यांशी बोलत. या साऱ्या विचारमंथनातून एक गोष्ट स्पष्ट होत होती की, ही परिस्थिती निवळावी यासाठी इथल्या लोकांनी भारत दर्शन करायला पाहिजे. तिथली परिस्थिती, भारतीयांचे प्रेम त्यांना स्वत:ला अनुभवता आले पाहिजे. नाहीतर आत्ता आहे त्याच मानसिकतेत ते जगत राहतील, त्यांच्या भारतद्वेषाची पाळेमुळे आणखी खोल रुतत राहतील. परंतु हे व्हावे कसे? यासाठी भय्याजींना एक युक्ती सुचली. मणिपूर, नागालँडमधील छोटया मुलांना ईशान्येतर भारतात नेऊन त्यांच्यावर ‘भारतीयत्वाचे संस्कार’ केले, तर भविष्यात मोठा फरक पडू शकेल हे त्यांना स्पष्टपणे दिसत होते. झाले, विचार पक्का झाला. त्याप्रमाणे ते तिथल्या मुलांच्या पालकांशी बोलणे करू लागले. पण त्या लोकांना हे काही पचेना. ते पालक भय्याजींना म्हणू लागले की तुमचे सगळे बोलणे पटते, पण तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यावर उपाय म्हणून तुमचा जयवंत इथे आमच्या गावात ठेवा आणि आमची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात न्या. भय्याजींनी हे लगेच मान्य केले. संभाजीराजांच्या, गुरू गोविंदसिंगांच्या गोष्टी सांगून त्यांनी जयवंतचेही मन तयार केले. सर्वप्रथम त्यांनी 12 मुले आपल्याबरोबर आणली. हळूहळू करत अशी 300हूनही अधिक मुले त्यांनी येथे आणून स्वत:च्या पायावर उभी केली. आजच्या घडीला हे कार्य करणाऱ्या जनकल्याण समितीची 8 वसतिगृहे महाराष्ट्रात आहेत. तिथे 115 मुले व मुली शिक्षण घेत आहेत. मेघालय, नागालँड, मणिपूर येथील ख्रिश्चन तसेच स्वधर्म पाळणारी अशी ही मुले आहेत.                                                    
‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे काम प्रामुख्याने मणिपूर भागात चालते. येथील मैदानी भागात वैष्णवपंथी समाज राहतो. परंतु वैष्णव असले, तरी ईशान्येतर भारतीयांशी ते फटकूनच वागतात. कारण आम्ही मूळचे मंगोलियन वंशाचे आहोत व इथे येऊन आम्ही वैष्णव झालो, अशी भावना त्यांच्या मनात रुजवली गेली आहे. अशा अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, छोटया-मोठया संकटांशी इथला समाज जवळजवळ गेली 200 वर्षे झुंजत आहे, याची भय्याजींना जाणीव होती. अशा या सर्वांगसुंदर परंतु संकटांनी घेरलेल्या प्रदेशाला आज आपल्या मदतीची नितांत गरज आहे आणि अपेक्षाही.

आपण कोणती मदत करू शकतो?
शत्रूंचा प्रभाव कमी करायचा असेल, तर सर्वसामान्य भारतीयांनीच या भागात अधिकाधिक मित्र जोडणे आवश्यक आहे. ईशान्य भारत अजूनही पर्यटनदृष्टया फारसा प्रचलित अथवा लोकप्रिय  नसलेला प्रदेश आहे. तेथे आपण सहली काढू शकता. येताना छोटे छोटे कार्यक्रम ठरवून येऊ शकता. लहान मुलांची व्यक्तिमत्त्व विकास  शिबिरे, भाषा, गणित, विज्ञानातील गमतीजमती, महिलांसाठी विविध माहितीपर शिबिरे, तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे इत्यादी अनेक कार्यक्रम आहेत. अशा अनेक प्रकारच्या तज्ज्ञ  लोकांची येथे गरज आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनाही आम्ही मेडिकल कॅम्पस घेण्यासाठी येथे आमंत्रण देऊ इच्छितो. प्रतिष्ठानतर्फे येथे अन्यही काही उपक्रम चालतात. वृक्षतोड थांबवून येथील शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यावरणप्रेमींची व कृषितज्ज्ञांचीही आवश्यकता आहे. साक्षरता मोहीम, स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग असे उपक्रमही चालूच असतात.
‘पूर्वांचल सीमा विकास प्रतिष्ठान’च्या वतीने आता मणिपूर येथे तीन शाळा चालवल्या जातात. 300हूनही अधिक मुले येथे लौकिक शिक्षणाबरोबरच, राष्ट्रीयत्वाचेही शिक्षण घेत आहेत. तिन्ही शाळांमधून दहावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. या शाळांना चांगल्या शिक्षकांची खूप गरज आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी करण्याऐवजी 1 ते 2 वर्षे आमच्या शाळांत आपण द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानने तरुणांना केले आहे. मातृसत्ताक पध्दतीमुळे महिलांच्या दृष्टीने हा प्रदेश खूप सुरक्षित आहे. त्यामुळे तरुणींना, तसेच निवृत्त जीवन जगणाऱ्या ध्येयवादी विचारवंतांनाही आम्ही या लेखाद्वारे असेच आवाहन करतो आहोत. विविध दस्तऐवजांच्या लिखाणासाठी आणि वेगवेगळया प्रकारच्या मुलाखती घेऊ शकणाऱ्यांची इथे बरीच मदत होईल. निरनिराळया उत्सवांच्या फोटो व शूटिंगच्या निमित्ताने आपण येऊ शकता.
इतक्या मोठया संस्था चालवणे हे समाजाकडून होणाऱ्या आर्थिक मदतीशिवाय तर शक्यच नसते. म्हणूनच आर्थिकदृष्टया सक्षम नागरिकही या राष्ट्रकार्यासाठी सढळ हस्ते मदत करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. प्रतिष्ठानच्या तिन्ही शाळा विनाअनुदानित आहेत. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा  वार्षिक खर्च वीस हजार रुपये आहे. अनिवासी विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च दहा हजार रुपये आहे. या विद्यार्थी दत्तक योजनेबरोबरच संस्थेला इमारत उभारणी, वाचनालय, प्रयोगशाळा, संस्थेचा वार्षिक उत्सव, व्यवसाय मार्गदर्शन, शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक शिबिरे, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, शालेय साहित्य आणि वर्गातील फर्निचर व्यवस्था, क्रीडा साहित्य आदींसाठी निधीची आवश्यकता आहे.
(सर्व छायाचित्रे मनोज मेहता, डोंबिवली यांच्या सौजन्याने)
  8779682592
संपर्क :- 
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, जयवंत कोंडविलकर.
मोबाइल- ९६१९७२०२१२. 
संस्थेसाठी मदतीचे धनादेश ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ या नावाने काढावेत

भूकबळीला तोंड देण्याचे आव्हान

source link

     जगातल्या 8.1 अब्ज लोकसंख्येपैकी 80 कोटी म्हणजे 12 टक्के लोक भूकबळीचे शिकार आहेत. 20 कोटी भूकबळीचे शिकार असलेल्या लोकसंख्येसोबत भारत यात पहिल्या क्रमांकावर आहे.ही अवस्था त्या वेळेस आहे, ज्यावेळेस जगभरात भरपूर अन्नधान्य आणि अन्य खाद्यपदार्थांचे उत्पादन होत आहे. जगभरात कुठे गृहयुद्ध तर कुठे नैसर्गिक आपत्ती यामुळे लोक आपले घरदार, आपला देश सोडून दरवेशी जीवन जगत आहेत. आपल्या आयुष्यातूनच उठलेले हे लोक द्रारिद्ˆय आणि भूकबळीमध्ये जगण्याचा अभिशाप घेऊन जन्माला आले आहेत.यापैकी बहुतांश लोक गरीब देशाच्या दिशेने स्थलांतर करत आहेत,त्यामुळे अन्नसंकट आणखी गडद होत आहे.

     अन्न आणि कृषी संघटनच्या 2017 च्या अहवालानुसार भारतात कुपोषित लोकांची संख्या 19.07 कोटी आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे.देशात 15 ते 49 वर्षांच्या 51.4 टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे.पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या 38.4 टक्के मुले आपल्या वयाच्या मानाने कमी उंचीची आहेत.21 टक्के मुलांचे वजन फारच कमी आहे. भोजन कमतरतेच्या आजारामुळे देशात दरवर्षी तीन हजार मुले आपल्या जीवाला मुकत आहेत.2016 च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 118 देशांमध्ये भारताला 97 वे स्थान मिळाले आहे. देशात 2015-16 मध्ये एकूण अन्नधान्य उत्पादन 25.22 कोटी टन होते. हा आकडा 1950-51 सालच्या पाच कोटी टनापेक्षा पाचपटपेक्षा अधिक होता.तरीही आपल्या देशात बहुसंख्य लोक भूकबळीच्या परीघात आहेत. असे नाही की, उत्पादित पीकपाणी आपल्या देशाच्या लोकसंख्येला कमी पडत आहे. खरी समस्या आहे ती, अन्नाच्या  नासाडीची! देशातल्या अन्नधान्यापैकी 40 टक्के अन्नधान्य उत्पादन आणि पुरवठ्याच्या विविध घटकांमध्येच खराब होते.देशातल्या एकूण गव्हाच्या उत्पन्नापैकी जवळपास 2.1 कोटी टन गहू सडून जातो.भारतीय कृषी संशोधन परिषद 2013 च्या अभ्यासानुसार प्रमुख कृषी उत्पादनाच्या नासाडीमुळे देशाला 92.651 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
     जगाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे,त्या हिशोबाने अन्नधान्याचे उत्पादन वाढताना दिसत नाही.कित्येक खाद्यान्न उत्पादन आणि अन्य धान्य पदार्थ आपला सर्वाधिक उत्पादनाचा स्तर ओलांढून आता उतरंडीला लागला आहे. म्हणजे त्यांचे उत्पादन कमी होत चालले आहे मात्र, इकडे लोकसंख्या लगातार वाढत आहे. यात अंडी ,   मांस, भाजीपाला, सोयाबीन,गहू आणि तांदूळसह 21 खाद्य पदार्थांचा समावेश आहे. या जगात खाद्य नासाडीला  सुरक्षेदृष्टीने एक मोठे संकट म्हणून  पाहिले जात आहे.2006 मध्ये सर्वाधिक उच्च स्तराला स्पर्श केल्यानंतर चिकनचे उत्पादन कमी होत चालले आहे.दूध आणि गव्हाने आपला सर्वाधिक उत्पादनाचा आकडा 2004 मध्ये ओलांडला होता.तांदाळाने याअगोदर 1988 मध्येच सर्वाधिक उत्पादनाचा विक्रम पार केला होता, आता तो पुन्हा उतरणीला लागला आहे. अशा परिस्थितीत इतक्या कमी कालावधी दरम्यान कित्येक महत्त्वाच्या अन्नधान्य उत्पादनात घसरण जगासमोर मोठ्या चिंतेचा विषय आहे. असा अंदाज आहे की,जगाची लोकसंख्या 2050 मध्ये नऊ अब्जावर पोहोचेल.तेव्हा सध्याच्या अन्नधान्य उत्पादनापेक्षा दुप्पट अन्नाची गरज पडणार आहे.भारतासारख्या देशात तर आतापासूनच नवनवे उपाय शोधावे लागणार आहेत.शिवाय आपल्या लोकसंख्येलादेखील आवर घालावा लागणार आहे.
     येल युनिवर्सिटी,मिशीगन स्टेट युनिवर्सिटी आणि जर्मनीच्या हेमहोल्ज सेंटर फॉर एनवायर्नमेंट रिसर्चच्या ताजा संयुक्त अभ्यासानुसार परीक्षण करण्यात आलेल्या 21 अन्नधान्यांपैकी 16 अन्नधान्यांनी 1988 ते 2008 दरम्यान आपले सर्वाधिक उत्पादन दिले आहे. एक खाद्य स्त्रोत नष्ट झाला तर दुसर्‍या खाद्यावर अवलंबून राहण्याची गोष्ट केली जाते. पण एकाचवेळेला अनेक खाद्यस्त्रोत नष्ट झाले तर कोणता पर्याय निवडणार? त्यामुळे ही परिस्थिती मोठे संकट म्हणून उभे राहणार आहे.
     वेगाने वाढणारी लोकसंख्या, निवारा, शेती,व्यवसाय आणि इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी जमिनीचा वापर केला जात आहे.कृषी आणि अन्य अन्नाच्या अन्य स्त्रोतांसाठी जमीन कमी होत चालली आहे.शिवाय अधिक अन्न उत्पादन निर्मितीसाठी जमीन आणि पाण्याचा अधिकाधिक वापर केला जाऊ लागला आहे.त्यामुळे ही संसाधने कमी झाल्याने भविष्यात खाद्यान्न उत्पादन वृद्धीला मोठा झटका बसू शकतो.
     शेतजमिनीचा कस आणि पोत याबाबतीतही बरेच संशोधन झाले आहे. पण पहिल्यांदाच अहमदाबादच्या स्पेस एप्लिकेशन सेंटरच्या सतरा अन्य एजन्सींच्या मदतीने संपूर्ण देशातील कृषी जमिनीची सध्याची आवस्था सादर करण्यात आली आहे. यानुसार देशातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र वाळवंटात रुपांतरित होत आहे. एकूण 32 टक्के जमिनीची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यातच देशातील 69 टक्के जमीन शुष्क क्षेत्रात समाविष्ट होत आहे. जमिनीचा कस वाचण्यासाठी लवकरच आपल्याला मोठे अभियान चालवावे लागणार आहे. असे केले नाही तर देशातल्या लोकसंख्येच्या मोठ्या हिश्यात फक्त आजीविका संकट आणखी गडद होणार नाही तर जैव-विविधतेचेही जबरदस्त नुकसान होणार आहे. आतापर्यंत राजस्थान आणि काही प्रमाणात गुजरात वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो. पण हा अभ्यास सांगतो की, वाळवंटी प्रक्रिया बर्फाळ प्रदेश आणि जंगलांसाठी प्रसिद्ध जम्मू-काश्मिरपर्यत सुरू झाली आहे. राजस्थानचा 21.77 टक्के , जम्मू आणि काश्मिर 12.79 टक्के आणि गुजरातचा 12.72 टक्के प्रदेश वाळवंटी बनला आहे.
     गुजरात सरकारने काही ठोस उअपाययोजना केल्या आहेत, याचा लाभ अन्य राज्ये उठवू शकतात. अलिकडेच  आंतरराष्ट्रीय खाद्यनीती शोध संस्थेच्या एक शोधपत्रिकेत सांगितले गेले आहे की, गुजरातमध्ये 2000 सालापासून कृषी मूल्यवर्धन 9.6 टक्के दराने दरवर्षी वाढत आहे. हा आकडा भारताच्या विकास दराच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक आहे आणि पंजाबमध्ये हरितक्रांतीदरम्यान मिळवलेल्या विकास दरापेक्षाही अधिक आहे.याशिवाय हजारोंच्या सख्येने धरणे बांधण्यात आली आहेत आणि ठिबक सिंचन योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे उभे करण्यात आले आहे. सिंचन क्षेत्रात दरवर्षी 4.4 टक्के दराने वाढ होत आहे.करार शेतीमुळे वाणिज्य क्षेत्रालाही मोठी मदत होत आहे.
     आगामी चाळीस वर्षात देशाची लोकसंख्या 160 कोटीपेक्षा अधिक होईल. त्याचबरोबर अन्नधान्याची मागणीदेखील जवळपास दुप्पट वाढेल. पण कृषी विस्तारासाठी आपल्याकडे फारच मर्यादित शक्यता आहेत. गेल्या 25 वर्षात कृषीक्षेत्रातली गुंतवणूक कमी होत चालली आहे. जेनेटिकली मॉडीफाइड (जीएम) पिकांशिवाय कृषीक्षेत्रात संशोधनदेखील अधिक होताना दिसत नाही. हरितक्रांतीदरम्यान आम्ही पिकांचे उत्पन्न प्रमाण तीन ते सहा टक्क्यांपर्यंत वाढवले होते. आता मात्र, 1 टक्क्याच्या वेगाने वाढत आहे. काही ठिकाणी तर यावर पूर्णविराम आला आहे.तज्ज्ञानुसार मागणीच्या तुलनेत सध्याच्या अन्नधान्य उत्पादनाच्या दुप्पट लक्ष्य मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याबरोबरच उपासतपासाचे मार्ग स्वीकारावे लागतील.

आई…

source link

आई…
कोंबड आरवायच्या आधीच 
तिने घेतलेली असायची 
डोक्यावर माळव्याची पाटी
चालत रहायची अनवाणी 
नसायची अंधाराची अथवा 
विचूकाट्याची भीती 
मनात एकच ध्यास 
दिवस वर येण्यापूर्वी 
पाटीतला भाजीपाला 
खपायलाच हवा… 
परत धा वाजता 
मजुरीवर पोचायला हवं… 
तिच्या त्या ढोर मेहनतीत 
तिने पेरली होती 
उज्वल भविष्याची स्वप्ने… 
आज ना उद्या या घामावर 
सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल…..
कधीच ती दिसली नाही हतबल 
पण….
माहीत नाही तिची स्वप्ने 
पूर्णत्वाला गेली की नाही 
सुखदु:खात कायम स्मरते 
माझी सतत राबणारी आई! 
…. प्रल्हाद दुधाळ.

अपमान का बदला… खून?

source link

     आजच्या माणसात सहनशीलता कमी व्हायला लागली आहे.लोकसंख्येच्या गर्दीत,वेगाच्या मागे धावणार्या माणसाला पदोपदी अपमानाला सामोरे जावे लागत आहे. जाणत्याअजाणतेने होणार्या चुका त्याला अपमानाकडे घेऊन जात आहेत.पण हा अपमान सहन करण्याची वृत्ती कमी झाल्याने भांड्याला भांडे लागल्यावर वाजते, तसे तोंडाला तोंड लागून शिवीगाळ, वाट्टेल तसे बोलणे, अशा ठिणग्या पडायला लागतात. कधी कधी त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन मोठा स्फोट होतो. यातून नवीनच काही तरी निपजतं. आजच्या तरुणपिढी विषयी बोलायची सोय राहिलेली नाही. त्यांना अपमान काळात कसं वागावं, याचं शिक्षणचं कुणी देत नाही. आईवडीलसुद्धा कशाला कुणाचं ऐकून घेतो? हाणायची नाही का थोबाडीत, असे सांगून त्याला भडकावून सोडतात.साहजिकच शाळाकॉलेजात पोरं शिक्षकांसमक्षच हाणामारी करताना दिसतात. इतकेच काय परीक्षेत बघू दिले नाही, म्हणून शिक्षकांवरच हल्ला करायला मागे पुढे पाहात नाहीत.

     आज या मुलांना कुणी समजावून सांगायचं कुणी धाडस करीत नाही. कारण सांगण्यापेक्षा त्याच्या वाट्याला अपमानच येतो.त्यामुळे आजची तरुणपिढी भरकटत चालली आहे.त्यामुळे अशा मुलांना चांगल्यावाईटाच्या चार गोष्टी सांगायच्या कोणी, असा प्रश्न आहे. चांगली पुस्तके वाचली तर निदान त्यातून तरी काही समजून घेतली असती ही मुले, पण पाठ्यक्रमाची पुस्तकेच न वाचणारी ही पुस्तके कुठली वाचणार? आईबाप अडाणी,त्यांना काय माहीत वाचनाचा लाभ ? शाळाकॉलेजमध्येही वाचनालये समृद्ध आहेत. पण तिकडे कुणी फिरकत नाही. आज तर मुलांच्या,युवकांच्या हातात स्मार्टफोन आहे. पाचदहा हजाराचा स्मार्टफोन घेऊन द्यायला पालकांकडे पैसा आहे,पण एखादे चांगले पुस्तक घेऊन द्यायला या लोकांकडे पैसा नाही. आईबापांनाही आपल्या मुलाचे हित कशात आहे, हे शोधायला, विचार करायला वेळ नाही. इतकेच काय आपला मुलगा,मुलगी दिवसभर काय करतात, याची फिकीर करायलासुद्धा यांच्याकडे वेळ नाही.त्यामुळे त्यांच्यावर चांगल्यावाईटाचे संस्कार कसे होणार?
     चांगला शिकूनसवरून चांगला ऑफिसर होण्याची स्वप्नं काही मुलं, त्यांचे आईबाप पाहात असतात. काहींच्या कष्टाला खरेच यश येते. खरे तर आजकाल पैसा महत्त्वाचा नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. आज पैसे कमवायला अक्कल लागत नाही. तसे असते लोक राजकारण्यांचे, सावकारांचे गुलाम म्हणून जगले नसते. छौ.. म्हटले अंगावर जाणारी पिढी आज तयार होत आहे. अशा लोकांकडे कुठे स्वत:ची अक्कल आहे? ऐशआरामात राहायला,चैनी करायला मिळत असेल तर आणखी काय हवंय? त्यामुळे खरे तर समाजातली शांतता भंग झाली आहे, त्याचे काय? हाणामारी,खून केल्यावर काहींच्या घरी पैसा पोहोच होत आहे.यात काही दिवस सुखात जातात. आजच्या पिढीच्यादृष्टीने हे सुखच! कारण फारसे माणसे मारायला आता फारसे कष्ट पडतच नाहीत. बिगरपरवाना हत्यारांचा बाजार वाढला आहे.तस्करी वाढली आहे. परवाच सांगलीच्या पोलिसांनी 26 पिस्तूलं जप्त केली. उत्तर प्रदेशात जाऊन तिथला बेकायदा पिस्तूल निर्मितीचा कारखाना उदवस्त केला. काय चाललंय काय समाजात? याच्याने कुणाच्या डोक्यात शांती वसणार आहे? शिवाय किती दिवस चालणार हे? कुणा विरोधी गुंडांच्या तडाक्यात किंवा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्येच जाणार. हे असले आयुष्य जगून हा बहुमोल माणसाचा जीव परत जाणार? माणसात आणि पशुपक्ष्यात फरक तो काय मग?
     आजकाल संस्कार महत्त्वाचे आहेत. अर्थात या संस्कारांची शिकवण घरातून, शाळेतून मिळते. पण ही संस्कारगृहे राहिलेली नाहीत. त्यामुळेच एक छोटा अपमान कुणाच्या आयुष्याला अधोगतीकडे नेतो, कुणाला प्रगतीकडे. ज्याने अपमान गिळला, ज्याने तो विसरला, समोरच्याला माफ केला तो साहजिकच चांगल्या ठिकाणीच पोहचेल. इथे कुणाची उदाहरणे द्यायची नाहीत.पण साधासोपा व्यवहार आहे.जो दुसर्याला माफ करतो,त्याचं चित्त स्थीर असणार आहे. त्याच्यावर,त्याच्या मनावर त्या अपमानाचा परिणाम झाला नाही. मात्र ज्याने अपमान मनावर घेतला,त्याचे आयुष्य मात्र उदवस्त होणार! कारण तो अपमान आपल्या पाठीवरून वाहून नेत असतो. समोरच्याला माफ करून पुढे जाता,तेव्हा किंवा त्याचक्षणी पाठीवरून त्याला उतरवता. आणि तेव्हाच माणूस जीवनात पुढे सरकू शकतो.

(कथा) दोन थेंब अश्रू

source link

     तो कैदी होता.त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती.एक दिवस संधी साधून तो तुरुंगातून पळाला. जोरजोराने तो धावत होता. आपली सगळी शक्ती एकवटून तो धावत होता.धावून धावून तो इतका थकून गेला की, वारंवार रस्त्यावर कोसळू लागला. पुन्हा धडपडत उठायचा आणि धावायला लागायचा. समोर एक रुंद नदी होती. नदी खूप खोलगट नव्हती.पण त्याला पोहायला अजिबात येत नव्हते.लाकडाचा एक चौरस तुकडा नदीच्या काठाला तरंगत होता.पोलिस शिपायांच्या भितीने भांबावून गेलेला तो कैदी आपला एक पाय लाकडावर ठेवण्याचा प्रयत्न करत होता.तेवढ्यात नदीकाठाला दोन माणसे आली. त्यातला एक त्याचा मित्र होता आणि दुसरा शत्रू. जो शत्रू होता, तो काही न बोलता गपचिप उभा राहिला.पण त्याचा मित्र आपली संपूर्ण ताकद लावून जोरजोराने ओरडू लागला, “ हे काय करतोयस? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? दिसत नाही का, हा लाकडी तुकडा पार कुजलेला आहे तो? तुझं वजन पेलणार नाही त्याला. हा मध्येच तुटून जाईल. मग तू मेलासच समज!”

पण नदी पार करायला दुसरा पर्यायच नाही. दिसत नाही का, शिपाई माझा पाठलाग करत आहे ते?” असे म्हणत त्या दुर्दैवी माणूस लाकड्याच्या तुकड्याच्या दिशेने चालू लागला.
परंतु, मी असा तुझा सर्वनाश होऊ देणार नाही!” त्याचा मित्र मोठ्याने ओरडला आणि लाकडी तुकडा त्याने लांब भिरकावून दिला.प्राणाच्या भितीने गारवटून गेलेल्या कैदीला तो लाकडाचा तुकडा मिळवणं भाग होतंस्वत:ला वाचवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. त्याने त्या तुकड्यासाठी पाण्यात उडी मारली. एकदादोनदातो वर आला आणि मग त्याने कायमची जलसमाधी घेतली.
त्याचा शत्रू जोरजोराने काहीबाही बोलून निघून गेला, मात्र त्याचा मित्र मात्र स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
त्याच्या डोक्यात एक क्षणदेखील असा विचार आला नाही की, त्याच्या मित्राच्या मृत्यूला तो स्वत: जबाबदार आहे.
तो रडून रडून सांगत होता– “ त्याने माझे ऐकले नाही.माझी एकही गोष्ट ऐकली नाही.”  ज्यावेळेला लोकांनी त्याला खूप समजावलं,त्यावेळी त्याने स्वत:चे सांत्वन करण्याचा मार्ग शोधून काढला. “ जर तो जिवंत असता तरीही त्याला तुरुंगात सडून मरावे लागले असते. आता कमीतकमी त्याच्या यातना तरी कमी झाल्या.” तरीही लोकांमध्ये त्या कैद्याची चर्चा चालायची,तेव्हा त्याचे  डोळे डबडबून यायचे. आपल्या दुर्दैवी मित्रासाठी तो माणूस नेहमी दोन थेंब अश्रू वाहायचा.( मूळकथाइयान तुर्गनेव )
अनुवादमच्छिंद्र ऐनापुरे    

(कथा) दोन थेंब अश्रू

source link

     तो कैदी होता.त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती.एक दिवस संधी साधून तो तुरुंगातून पळाला. जोरजोराने तो धावत होता. आपली सगळी शक्ती एकवटून तो धावत होता.धावून धावून तो इतका थकून गेला की, वारंवार रस्त्यावर कोसळू लागला. पुन्हा धडपडत उठायचा आणि धावायला लागायचा. समोर एक रुंद नदी होती. नदी खूप खोलगट नव्हती.पण त्याला पोहायला अजिबात येत नव्हते.लाकडाचा एक चौरस तुकडा नदीच्या काठाला तरंगत होता.पोलिस शिपायांच्या भितीने भांबावून गेलेला तो कैदी आपला एक पाय लाकडावर ठेवण्याचा प्रयत्न करत होता.तेवढ्यात नदीकाठाला दोन माणसे आली. त्यातला एक त्याचा मित्र होता आणि दुसरा शत्रू. जो शत्रू होता, तो काही न बोलता गपचिप उभा राहिला.पण त्याचा मित्र आपली संपूर्ण ताकद लावून जोरजोराने ओरडू लागला, “ हे काय करतोयस? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? दिसत नाही का, हा लाकडी तुकडा पार कुजलेला आहे तो? तुझं वजन पेलणार नाही त्याला. हा मध्येच तुटून जाईल. मग तू मेलासच समज!”

पण नदी पार करायला दुसरा पर्यायच नाही. दिसत नाही का, शिपाई माझा पाठलाग करत आहे ते?” असे म्हणत त्या दुर्दैवी माणूस लाकड्याच्या तुकड्याच्या दिशेने चालू लागला.
परंतु, मी असा तुझा सर्वनाश होऊ देणार नाही!” त्याचा मित्र मोठ्याने ओरडला आणि लाकडी तुकडा त्याने लांब भिरकावून दिला.प्राणाच्या भितीने गारवटून गेलेल्या कैदीला तो लाकडाचा तुकडा मिळवणं भाग होतंस्वत:ला वाचवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. त्याने त्या तुकड्यासाठी पाण्यात उडी मारली. एकदादोनदातो वर आला आणि मग त्याने कायमची जलसमाधी घेतली.
त्याचा शत्रू जोरजोराने काहीबाही बोलून निघून गेला, मात्र त्याचा मित्र मात्र स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
त्याच्या डोक्यात एक क्षणदेखील असा विचार आला नाही की, त्याच्या मित्राच्या मृत्यूला तो स्वत: जबाबदार आहे.
तो रडून रडून सांगत होता– “ त्याने माझे ऐकले नाही.माझी एकही गोष्ट ऐकली नाही.”  ज्यावेळेला लोकांनी त्याला खूप समजावलं,त्यावेळी त्याने स्वत:चे सांत्वन करण्याचा मार्ग शोधून काढला. “ जर तो जिवंत असता तरीही त्याला तुरुंगात सडून मरावे लागले असते. आता कमीतकमी त्याच्या यातना तरी कमी झाल्या.” तरीही लोकांमध्ये त्या कैद्याची चर्चा चालायची,तेव्हा त्याचे  डोळे डबडबून यायचे. आपल्या दुर्दैवी मित्रासाठी तो माणूस नेहमी दोन थेंब अश्रू वाहायचा.( मूळकथाइयान तुर्गनेव )
अनुवादमच्छिंद्र ऐनापुरे    

धूळ, धूर, गर्दी इत्यादींमुळे होणारा त्रास आणि काही योगोपचार

source link

दिवाळीचे दिवस सध्या सुरु आहेत. त्यामुळे माझे अनेक स्टुडंटस भेटण्यासाठी म्हणून येत आहेत. काल त्यांतील एकाने सहज बोलता बोलता त्याला होणारा त्रास सांगितला आणि योगाद्वारे काही उपाय करता येईल का ते विचारले. त्याने मला जे सांगिलते ते थोडक्यात असे…

दिन दिन दिवाळी

source link

मी सुध्दा अगदी लहान असतांना म्हणजे शाळेत जायच्याही आधी एक बडबडगीत ऐकले आणि गुणगुणले होते आणि ते अजून माझ्या लक्षात आहे. यातला कोण लक्षुमन, कसली खोब-याची वाटी आणि कुठल्या वाघाच्या पाठीत कुणी काठी घालायची असले प्रश्न तेंव्हा माझ्या मनात आले नव्हते आणि नंतर मलाही कोणी विचारले नाहीत. दर वर्षी दिवाळीच्या दिवसात या गाण्याची पारायणे होत असत आणि त्या वेळी घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये जी कोणी लहान मुले असतील त्यांना हे गाणे शिकवून त्यांच्याकडून बोबड्या बोलात हावभावासह म्हणून घेतले जात असे.

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ।
गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या ।
लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा ।
दे माय खोबऱ्याची वाटी ।
वाघाच्या पाठीत घालीन काठी ।।

या बडबडगीताला जोडून दिवाळीमधल्या इतर दिवसांचे छान वर्णन करणारे एक गाणे मला या ध्वनिफीतेमध्ये मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=bR3dneyjJ-4
———————-

माझ्या जन्माच्याही आधी म्हणजे १९४० च्या काळातल्या शेजारी या खूप गाजलेल्या आणि सामाजिक प्रबोधन करणा-या चित्रपटातले अत्यंत जुने पण तरीही आजतागायत ऐकू येणारे असे दीपोत्सवावरचे अजरामर गाणे आहे, लखलख चंदेरी. शेजारी राहणा-या दोन मित्रांमध्ये निर्माण झालेला दुरावा संपून शेवट गोड झाल्यानंतर सगळे गांवकरी एकमुखाने हे गीत गात आणि त्या तालावर नाचत दिवाळीचा आनंदोत्सव कसा साजरा करतात याचे चित्रण या गाण्यात सुरेख केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=qNAdSpieRCg
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया।
झळाळती कोटी ज्योती या, हा, हा।।

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून ।
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण ।
नाचती चंद्र तारे,  वाजती पैंजण ।
छुनछुन झुमझुम, हा, हा ।।

झोत रुपेरी, भूमिवरी गगनात ।
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत ।
कणकण उजळीत, हासत हसवीत ।
करी शिणगार, हा, हा ।।

आनंदून रंगून, विसरून देहभान ।
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया ।
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून ।
एक होऊ या, हा, हा ।।

—————————————-

माझ्या लहानपणी १९५५ साली आलेल्या भाऊबीज या सिनेमातले सोनियाच्या ताटी हे गाणे माझ्या एकाद्या बहिणीच्या तोंडी ऐकल्याशिवाय माझी भाऊबीज कधी साजरी होत नव्हती. आशाताईंनी गायिलेले हे गोड गाणेसुध्दा साठ वर्षांनंतर अजून टिकून राहिले आहे.  भावाबहिणीमधल्या नात्याचा सगळा गोडवा या गाण्यात उतरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=p_C1k78XuBs
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ।
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

माया माहेराची पृथ्वीमोलाची ।
साक्ष याला बाई, चंद्रसूर्याची ।
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

चांदीचे ताट, चंदनाचा पाट ।
सुगंधी गंध दरवळे, रांगोळीचा थाट ।
भात केशराचा, घास अमृताचा ।
जेवू घालिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी ।
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी ।
नक्षत्रांची सर, येई भूमिवर ।
पसरी पदर भेट घ्याया ।
चंद्र वसुधेला, सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

पंचप्राणांच्या वाती, उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया

—————————————–
अष्टविनायक या चित्रपटातली सगळीच गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि लोकांच्या ओठावर बसली. त्यातले एक गाणे खास दिवाळी या सणावर होते. तसे पाहता अमावास्येच्या आगे मागे असलेल्या दिवाळीत कसले मंद आणि धुंद चांदणे आले आहे ? उलट दिव्यांच्या रांगा लावून गडद अंधाराचा नाश करणे हा दीपावलीचा उद्देश असतो. पण ज्यांच्या मनातच प्रेमाचे चांदणे फुलले आहे, नयनांमध्ये दीप उजळले आहेत त्यांना त्याचे काय ? दिवाळीचा परम आनंद आणि उत्साह या गाण्यात छान टिपला आहे.
https://www.youtube.com/watch?v=oPIMAnIdq2s

आली माझ्या घरी ही दिवाळी ।
सप्तरंगात न्हाऊन आली ।।

मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे ।
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे ।
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे ।
कोर चंद्राची खुलते भाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले ।
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले ।
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी ।
सूर उधळीत आली भूपाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली ।
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली ।।
संग होता हरी जाहले बावरी ।
मी अभिसारीका ही निराळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।
——————————

(कथा) एक अदभूत कथा

source link

     ऑस्टीनच्या उत्तर प्रांतात कधी काळी स्मोथर्स नावाचे एक प्रामाणिक कुटुंब राहत होते.जर शहरातल्या लोकसंख्येच्या समांतर एखाद्या विशेष लेखासाठी विचार केला तर, कुटुंबात एकूण सहा माणसे होती. या सहा माणसांमध्ये समावेश होताजॉन स्मोथर्स,त्याची बायको, ती स्वत:,त्यांची एक पाच वर्षांची मुलगी आणि मुलीचे पालक. खरे तर वास्तविक मोजल्यावर ते तीनच होते.
एका रात्रीला जेवण झाल्यावर मुलीच्या पोटात जोराने दुखायला लागले,तेव्हा बाप लगेच औषधे आणायला धावला. तो पुन्हा कधी परत आला नाही.
     

काही दिवसांनी मुलीची तव्येत बरी झाली.पुढे ती मोठी झाली. यौवनात आली. नवर्याच्या जाण्याने आई अगदी कोलमडून पडली होती.

या दु:खातून बाहेर पडण्यासाठी नवर्याच्या मृत्यूनंतर तीन महिन्यानंतर तिने दुसरे लग्न केले आणि सेंट एंटोनियोला निघून गेली.
छोट्या मुलीनेदेखील मोठे झाल्यावर लग्न केले आणि जेव्हा काही वर्षे उलटली,तेव्हा तीदेखील एका पाच वर्षाच्या मुलीची आई म्हणून ओळखली जाऊ लागली. ती आजसुद्धा त्याच घरात राहते,जिथून तिचा बाप एकदा गेला तो गेला, तो पुन्हा कधी परत आला नाही.
एका रात्री योगायोगाने तिच्या लहान मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केली.ही रात्र जॉन स्मोथर्सच्या बेपत्ता होण्याची रात्र होती.याच रात्री काही वर्षांपूर्वी जॉन स्मोथर्स गायब झाले होते,ते आज जिवंत असते तर या लहान मुलीचे आजोबा म्हणून ओळखले असते.
मी शहरात जाऊन हिच्यासाठी औषध आणतो.” जॉन स्मिथ मुलीचा त्रास पाहून म्हणाला.( जॉन स्मिथ आणखी कोणी नाही तर त्या लहानाची मोठी झालेल्या मुलीचा नवरा आहे आणि छोट्या मुलीचा बाप.)
“  नाही, अजिबात नाही,जॉन.” त्याच्या बायकोने तेव्हा त्याला हे सांगून थांबवले की, तोही कायमचा बेपत्ता होईल आणि परत येण्याचे विसरून गेला तर…!
तेव्हा जॉन स्मिथने जायचा विचार सोडून दिला आणि बायकोसोबत छोट्या पैंसीच्या डोक्याजवळ बसून राहिला.( छोट्या पाच वर्षाच्या मुलीचे नाव पैंसी होते.)
काही वेळानंतर पैंसीची तब्येत आणखी बिघडली, तेव्हा जॉन स्मिथ पुन्हा औषध आणायला जाण्याचा प्रयत्न केला,पण त्याच्या बायकोने तिला जाऊ दिले नाही.
पुन्हा अचानक घराचा दरवाजा उघडला, त्यातून एक कमरेतून झुकलेला म्हातारा माणूस आत आला.
आजोबा!”  पैंसी पटकन बोलली. तिने त्या माणसाला घरातल्या बाकी सदस्यांअगोदर ओळखले होते.
म्हातार्या माणसाने आपल्या खिशातून एक औषधाची बाटली बाहेर काढली आणि त्यातले चमचाभर औषध पैंसीला पाजले.
ती झटकन बरी होऊन उठून बसली.
मग जॉन स्मोथर्स म्हणाला, “  मला यायला थोडा उशीर झाला. मी गाडीची वाट पाहात होतो.” (कथा–   ओ हेनरी)
                                                                                                                  अनुवादमच्छिंद्र ऐनापुरे